आठवड्याच्या व्यस्त शेड्युल नंतर, काही धमाल विकेंड्स नंतर, एक संध्याकाळ अशी येते, जी मनाला पार उदास करून जाते. बाहेर पाच वाजताच पडलेला अंधार त्यात भर घालत असतो. बाहेर जीवघेणी शांतता पसरलेली, झाडे स्तब्ध, पाने गळालेली. वाटतं .. जग काही वेळासाठी थांबलेलं आहे ... किंवा वेळ जगासाठी?
टीव्ही लावावा तर एकही धड पाहण्यासारखा कार्यक्रम नसतो. ऑरकुट, फेसबूक कितीही रीफ़्रेश केलं तरी स्क्रॅप काऊंट वाढत नाही. सकाळ, मटा, लोकसत्ता च्या साईटवरच्या रटाळ बातम्या अपडेट होत नाहीत. इतकच काय, तर गुगल वर रॅंडम सर्च केलं तरी वाचावं वाटेल असं काही मिळणं मुश्किल असल्याचं जाणवतं. उद्या सोमवार असल्याची जाणीव होताच जीव अजूनच कासावीस होतो. अजून पाच दिवस ढकलायचे आहेत याची जाणीव होते. मनाची मग मेंदू समजूत काढतो - निदान ही संध्याकाळ ५-६ दिवस तरी परत येणार नाही!
पण जसा चांगल्या गोष्टींचा अंत होतो तशीच ही संध्याकाळही संपते!
एखादा जुना मित्र ऑनलाईन भेटतो, पूर्वीच्या दिवसांची आठवण, उजळणी होते. सेव केलेल्या ऑरकूट विडिओतील गाण्यांमुळे मन ताजं तवानं होतं. काही वर्षांपूर्वी झालेली ई-मेल कॉन्वर्सेशन्स वाचायला मजा येते. गिटारवर एखादी ट्यून सहजपणे जमून जाते. भूतकाळातील जतन केलेल्या स्मृती जाग्या होतात, आणि वाटतं - ही संध्याकाळ आली हे एका अर्थी बरंच झालं.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


2 टिप्पणी(ण्या):
हा blog जर कोणी अनोळखी व्यक्तीने वाचला तर नक्कीच त्या व्यक्तीला 'लेखक पन्नाशीतला आहे' असं वाटेल!
I could not believe this blog is written by you!
nice post by the way..
टिप्पणी पोस्ट करा