पुढील लेखामधे टीपिकल माणसाच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे (साधारण पाच पानात). ते डिस्टर्बिंग वाटू शकेल कदाचित. पण मी "द ट्रुथ निड्स टू बी टोल्ड" या मताचा आहे. मधे मधे विनोद घुसडण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो किती यशस्वी होईल याबाबत शंका आहेत. यातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत. यातील प्रसंग आणि माझ्या आयुष्यातील प्रसंग यातही काही साम्य नाही. वाचकांना डिप्रेस करण्याचा माझा हेतु नाही. उलट त्यांना यातून काही फायदा झाला तर मला आनंदच होईल. आणि हो, EULA वाचायला विसरू नका.
"शरदजी, मृत्युपत्रावर इथे सही करा." सावंत वकीलांनी सही करायची जागा दाखवत सांगितलं. "वकीलसाहेब, थोड्या दिवसांनी केली तर नाही का चालणार?" असहाय नजरेने बघत ७२ वर्षीय शरद केमकरने विचारलं. "नाही शरदजी, वसंत आणि प्रमिला पण आले आहेत अमेरिकेहून. आणि आपल्याकडे फार वेळही नाही." आपल्या तोंडातून बाहेर पडलेल्या शेवटच्या वाक्याचा सावंत यांना पश्चाताप झाल्याचं त्यांचा चेहेरा स्पष्ट सांगत होता.
शरदला मेडिकल रिपोर्टस दाखवण्याचं डॉक्टरांनी टाळलं असलं तरी आता आपल्याला झालेल्या आजराचं गांभिर्य त्याला कळून चुकलं होतं.
शरदच्या मनात विचार घिरट्या घालू लागले, "खेळ संपणार म्हणा तर आता. खरंच एवढा वेळ निघून गेला? कळलं कसं नाही एवढ्या गोष्टी घडून गेल्या तरी? अजूनही असंच वाटतय की कालपर्यंत तर आपण शाळेत जात होतो. गल्लीतल्या पोरांनी क्रिकेट खेळायला बोलावण्यासाठी मारलेली हाक अजूनही ऐकू येतीय. शाळा सुटल्यानंतर केलेला दंगा, नंतर लावलेली सायकलची शर्यत, बॉल लागून काच फुटल्यामुळे केलेली पळापळ, समोरच्या आजोबांची केलेली टिंगल, क्लास सूटल्यावर तासंतास मारलेल्या गप्पा... खरंच इतकं जूनं झालं हे सगळं?"
शरद अजूनच अस्वस्थ झाला. मनात विचार करु लागला, "हे कसं शक्य आहे? आत्तापर्यंत जे जे हवं ते ते मी मिळवून दाखवलं. आजूबाजूची परिस्थिती, लोक, पैसा, साधने या सगळ्यांना माझ्या तालावर नाचवलं. मी मनात आणलं तर काहीही करू शकतो, मी अभेद्य आहे, मला कोणीही अडवू शकत नाही. अगदी कोणीही... किती आत्मविश्वास होता मला आजपर्यंत?"
"हा अन्याय आहे. काळाने माझ्याबाबतीत केलेला अन्याय! एवढ्या गोष्टी घडून गेल्या तरी मला पत्ताही लागला नाही. विदाऊट वॉर्निंग बळी दिलं जात आहे मला. घोर अन्याय आहे हा!" शरदचं एक मन विचार करत होतं.
हे वाक्य शरदनी उच्चारताच त्याचं दुसरं मन त्याच्यासमोर प्रकटलं.
"अरे अन्याय कसला? तुम्ही लोक एकमेकांना फार फार तर ३ 'वॉर्निंग' देता. तुला जेवढ्या वॉर्निंग मिळाल्या आहेत तेवढे आकडेही तु मोजू शकत नाहीस."
"असं हवेत बोलू नको. सिद्ध कर काय म्हणायचंय तुला ते." शरदचं पहिलं मन रागाने म्हणालं.
"ऐक तर मग" शरदचं दूसरं मन बोलू लागलं.
तु तीन चार वर्षाचा असेपर्यंतचा काळ तुला आठवतही नसेल. तो सोडून देऊ आपण. पण तु ५ वर्षाचा झालास आणि तुला कोणी लहान आहेस म्हंटलं की लगेच राग येऊ लागला. इथेच तर जनरली मोठ व्हावं असं वाटण्याची सुरूवात होते.
आपण जसं 'मोठ्या' मुलांना दादा म्हणून हाक मारतो, तसंच आपल्यालाही कोणी दादा म्हणावं असं वाटू लागतं. 'मी शिशुगटात शिकतो' पेक्षा 'मी मोठ्या वर्गात गेलो' हे सांगताना जास्त आनंद होतो. पहिलीच्या वर्गात गेल्यावर तर आनंदाला पारावार उरत नाही. आणि अशातच तुला पहिली 'वॉर्निंग' मिळते - काळ वेगाने पुढे सरकत असल्याची. कधी? जेव्हा परिक्षा सुरु होतात तेव्हा. प्राथमिक शाळेत आलो खरा, पण आता ही कटकट मागे लागणार अशी जाणीव होते.
केवढा मोठा संदेश दडलेला असतो या छोट्याश्या गोष्टीत. "विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी!".
हायस्कूल मधे प्रवेश घेतल्यावर तर परिक्षा, अभ्यास, क्लास भंडावून सोडतात. तरी हाफ पॅंट टू फुल पॅंट जाण्यासाठी आठवीत जायची घाई असतेच. या घाई गडवडीत वॉर्निंग कसल्या दिसतायत? कधी एकदा दहावीची परिक्षा संपतेय असं होतं आणि परिक्षा संपते देखिल.
शरदच्या पहिल्या मनासमोर दुसरं मन त्याचा जीवनपट उलगडून दाखवत होतं.
पालकांनी सायकल विकत घेउन द्यावी म्हणून म्हणं किंवा ज्युनियर कॉलेजला मोपेडवरून जायला मिळेल म्हणून म्हण, तुला सारख मोठं व्हायची घाई होतीच. आणि रुटीन मधे तु इतका बूडला होतास की दिवस अगदी वेगाने सरले. कॉलेजचे दिवस तर कधी गेले कळलंच नाही. कसं असतं, की आवडीच्या गोष्टी मनुष्य करत असला ना, की वेळ पटकन गेल्यासारखं भासतं.
तुला जरी वाटत असलं की तुला काळ पुढे जात असल्याचं कळलं नाही, तरी काळ तुला सारखा सावध करण्याचा प्रयत्न करतच होता. आठव तो दिवस जेव्हा तु डोक्यावर पहिला पांढरा केस पाहिलास. काय रिऍक्शन होती तुझी? थोडा खिन्न झालास, पण दुसऱ्या क्षणी पुरावा नष्ट केल्याप्रमाणे मेंदी, कलर लावून तो झाकायचं ठरवलंस. मेंदी लावून काय घड्याळ मागे जाणार होतं? तु नुसता पांढरा केसच नाही लपवलास तर काळाच्या सूचनेकडे कानाडोळा केलास.
ग्रॅजुएट झालास आणि नोकरी लागली. दुपारची झोप बंद, तासंतास व्हिडीओगेम खेळणं बंद, संध्याकाळची टेकडी बंद.. पण लक्षात आलं का तुझ्या काळ किती वेगानं पुढे जातोय ते? मग ओघानं आलं उच्चशिक्षण. आता तु घरापासून दूर, मित्रांपासून दूर हजारो मैलावर दुसऱ्या देशात जाणार होतास. आता तु स्वतंत्र होतास. पण जबाबदाऱ्या वयाबरोबर आणखी ओढावून घेत होतास.
काळ पुढे नेण्याची घाई तु पंचवीसाव्या वाढदिवशी थांबवलीस. अचानक तुला कळलं की आता तीशी जवळ आली आहे. काही म्हण, २५ नंतर २६ हा आकडा अगदीच विचित्र दिसतो. नंतर लग्न झालं, आणि नको असतानाही तीशी पर्यंतचा काळ घाईतच उरकला.
एव्हाना प्रमाणाबाहेर खाणं, दारू अशा गोष्टींमुळे वय दोन एक वर्ष जास्तच दिसत होतं. वर्तमानपत्रात तीशीच्या इसमाचा 'प्रौढ' असा केलेला उल्लेख तुला मनात सलू लागला होता. आणि आता आपण लहान व्हावं असं तुला वाटायला लागलं!
नवीन सोसायटीत रहायला आल्यावर लहान मुलांशी हा 'दादा' क्रिकेट खेळून बालपणीच्या आठवणींना उजाळा देत होता. दिवस मजेत जात होते. तेवढ्यात कोण्या एका डांबरट पोराने तु विवाहित असल्याचं कळल्यावर तुला 'काका' केलं होतं. शरद दादाचे आता केमकर 'काका' झाले होते.
मुलांना शाळेत सोडणे, ऑफिसची कामे उरकणे, नातेवाईंकाचं येणंजाणं, बाजारहाट, इत्यादी करताना तु स्वता:ला वेळ नाही देऊ शकलास. सतार चांगली वाजवायचास, पण त्यात करियर करणं 'सेफ' नसल्यामुळे ते दूर ठेवलंस. अशा फार थोड्या गोष्टी होत्या ज्या तुला 'जगवू' शकत होत्या. पण 'सेफ' नव्हत्या ना त्या तुझ्या मते. म्हणून त्या तू सोडून दिल्यास.
सतत नोकरीचं टेन्शन त्यात असलेला पॉसिटीव्ह नंबरचा मोठा चष्मा यामुळे तुझा चेहेरा अधिकच गंभिर बनला होता. त्यात त्या 'काका' 'काका' अशा त्रासदायक हाका.... हळूहळू हा त्रास बंद झाला. कारण आजूबाजूच्या अजून काही दादांचे काका झाल्यामुळे आता तुला कंपनी होती. गल्ली क्रिकेट आता बंद झालं होतं. सगळेच मित्र संसारात व्यस्त असल्यामुळे आता कट्ट्यावरच्या गप्पा बंद झाल्या होत्या. मित्र भेटलेच तरी कुटुंबाबरोबर असल्यामुळे आता चर्चेचे विषय आता 'मर्यादित' होते.
चाळीशी मधे आरोग्याच्या तक्रारी सुदैवाने तुझ्या फार मागे लागल्या नाहीत. पण तेव्हा तुला पुन्हा तरुण व्हावं असं खुप वाटत असे. पण शरीर तेवढी साथ देत नाहीच तेव्हा. आणि 'स्टेटस' कमावून ठेवल्यामुळे तुझ्यासारख्या संसारी माणसाला मुक्तपणे काहीच करता येत नाही. या वयात काय हरकत आहे मोठ्यांदा गाणी म्हणली तर? कुठे बिघडलं डान्स केलास तर? पतंग उडवणे, गावभर भटकणे, साबणाचे फुगे सोडणे, पावसात भिजणे ही काय लहान मुलांची मक्तेदारी आहे? पण... 'स्टेटस' चं काय? इथेच तुला सन्यास का पॉप्युलर आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण तोपर्यंत तु इतका घाबरट बनला होतास की सगळं सोडून देणं अशक्य होतं.
मुलांच्या शाळा, दहावी बारावी च्या परीक्षा त्यांना मिळालेलं घवघवीत यश साजरं करणे यामधे वेळ वेगाने पुढे सरकत होती. म्हणजे असं तुला वाटत होतं. पण जेव्हा तु मुलाला भेटायला त्याच्या कॉलेजात गेलास तेव्हा त्याचा त्रासिक चेहेरा पाहुन त्यांना आता तु नकोसा झाला आहेस हे तुला कळुन चूकलं. आत्तापर्यंत मुलं धाकात होती पण आता तीही तुला 'लाईटली' घ्यायला लागली होती. ही खरंतर एक वॉर्निंगच होती, तुझी कारकिर्द संपल्याची. आता तु अजूनच एकटा पडत चालला होतास.
आता खरं तर तुझ्या नोकरी करण्याला काहीच अर्थ नव्हता. कमवणार तरी कोणाकरीता? घरी वेळ जात नाही म्हणून आपलं ऑफिसमधे जाउन बसायचं, झालं. उच्च शिक्षण घेऊन पोरं खोऱ्यानं पैसा ओढत होती. त्यांची लग्न झाल्यावर तुझी आता त्यांना तशी काहीच गरज नव्हती. अशातच साठी उलटली, नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आणि पेन्शनर क्लब सुरू झाला. व्यायामाला काडीचंही महत्व न देणारा तु आता सकाळ संध्याकाळ ५-६ किलोमिटर चालू लागलास. कारण तुझ्याकडे चॉईसच नव्हता. तुला मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हातात काठी असं चित्रही डोळ्यासमोर नकोसं वाटत होतं.
दिवस 'ढकलण्यासाठी' आता पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्याला पर्याय नव्हता. पुस्तकं कमी पडायला लागली आणि वर्तमानपत्र त्याच त्याच बातम्या छापतायत असं वाटू लागलं. जनरेशन गॅप मुळे कोणी तुझ्याशी बोलायला ईटरेस्टेड नव्हतं. तुला खचलेला पाहून बायको म्हणाली "शरद, कॉलेजला असताना सतारीवर यमन काय छान वाजवायचास! ए परत चालू कर ना सतार. बरं वाटेल आणि वेळही जाईल.". मग वॉचमनच्या मदतीने धूळ खात पडलेली सतार माळ्यावरून काढण्याचा कार्यक्रम झाला. यमन, दुर्गा, दरबारीमुळे तुला नवं आयुष्य सुरू झाल्यासारखं वाटू लागलं. इंजिनियरींग च्या 'अ'कलेबरोबरच जगण्यासाठी कला ही तितकीच महत्वाची असते हे तुला शेवटी का होईना, कळलं.
पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आवडीच्या गोष्टी होत असतात तोपर्यंत वेळ कधी जातो ते कळतच नाही. वन फाईन मॉर्निंग तुला समीर - तुझा जिवलग गेल्याची बातमी मिळाली. त्याच्याबरोबर एन्जॉय केलेले कॉलेजचे दिवस आठवले. आता मात्र तुझ्या पायाखालची जमिन सरकली. मृत्यु कोणाला टळला आहे रे. पण तु अशा भ्रमात होतास की काळ तुझ्यावर नाही तर तु काळावर अधिकार गाजवतो आहेस. समीर नंतर सुनील, पराग, अनिकेत.. एकएक गडी बाद होत गेले. तु इतका भेकड बनला होतास की तुला बायकोच्या आधी आपण वर जावं असं वाटत होतं. कारण तुला अजून एकटेपणा नको होता. कशी मजा आहे बघ. मृत्यु हवा पण त्यातही प्रेफरन्स हवा तुम्हा माणसांना. आता तो आला आहे. त्यामुळे आता धैर्याने त्यास सामोरा जा. त्याच चुका परत परत करु नकोस.
तुम्हा माणसांना वेळ फास्ट फॉर्वर्ड व रिवाईंड करायची खुप इच्छा असते. वाटतं, परिक्षा लवकर संपावी पण सुट्टी लवकर संपू नये. सकाळी ६ चा गजर वाजला तरी घड्याळात खरंच ६ वाजले आहेत का हे नकळत सगळेच लोक पुन्हा तपासून बघतात. 'अजून १० मिनिटांनी का वाजत नाहीत ६?' असे विचार मनात येतात. आपल्या सोयीप्रमाणे वेळ पुढे मागे नेण्याची खुप इच्छा असत. एक लक्षात ठेव, तुझी परिक्षा असते तेव्हा शिक्षकांना सुट्टी असते, तुझी सुट्टी असते तेव्हा शिक्षक बिचारे पेपर तपासत असतात. म्हणून जरी तुला फास्ट फॉर्वर्ड आणि रिवाईंड बटण दिलं तरी तु फास्ट फॉर्वर्ड करशील तेव्हा शिक्षक रिवाईंड करायला पाहतील. एकाची सुट्टी ही दुसऱ्याची परिक्षा असते. काळ त्यामुळे आपल्या एकाच गतीने पुढे जात राहतो.
शरदचं दुसरं मन नाहीसं झालं. शरदला मरायच्या आधी का होईना, सत्याची जाणीव झाली होती. आपण "यंग ऍट हार्ट" असलं पाहीजे, आणि विविध कला व छंद जोपासूनच आपण ते साध्य करू शकतो, हे त्याला कळलं. आपण आपल्या आनंदासाठी आजवर जगत आलो, पण जर दुसऱ्याच्या आनंदासाठी जगण्यात आनंद मानला असता, तर कदाचित जीवन सार्थक झालं असतं. फळाची अपेक्षा न बाळगता काम करत राहणं हे महत्वाचं आहे हे गीतेतलं वाक्य हेच सांगतं, हे त्याला आज कळलं. मरण काय आज ना उद्या येणारच आहे. पण आधी वेळ फुकट घालवला नाही, तर शेवटी अजून थोडा वेळ हवा होता असं वाटणार नाही. आता जे काही मोजके क्षण आयुष्यात उरले आहेत त्यांचा पुरेपुर वापर करायचा त्याने निर्धार केला.
शरदला जाऊन आज ४ वर्षे झाली. मृत्युपत्रात त्याने आपली इस्टेट निवडक सामाजिक संस्था व विविध कला विद्यालयांमधे वाटली. जाताना दुसऱ्या मनाशी झालेला संवाद त्याने आपल्या मुलांना सांगितला, त्यामुळे त्यांच्या या मृत्युपत्राबाबत काही तक्रारी नाहीत. ती आज जगायला शिकवणाऱ्या अनेक कला जोपासत आहेत. शरदच्या नावे 'तरुणाई' नावाची ट्रस्ट गुणवंत विद्यार्थ्यांचा दर वर्षी घड्याळ देउन सत्कार करते.
हा एवढा हेवी लेख वाचत ईथपर्यंत पोचल्याबद्दल अभिनंदन.
आता तुम्ही ईकडे लेख वाचत आला आहात की तसेच आला आहात हे कळण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे कृपया मला मेल करून अथवा कमेंट द्वारे कळवा :)
१. शरद नवीन सोसायटीत साधारण कितव्या वर्षी शिफ्ट झाला?
२. शरद व्यायाम कितव्या वर्षानंतर करू लागला?
इथे तरी आपण चिटिंग करणार नाही अशी आशा आहे. :)
बुधवार १५ ऑक्टोबर २००८
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

11 टिप्पणी(ण्या):
ek number!
जबर्या लिहीतोस रे तू! टेन्शनच आलं मला तुझं पोस्ट वाचून.. :O
khupach heavy post hota...pan awadla!
btw ek datar style comment...sagilakade parikshacha "ri" dirgha hawa.. :P
chhan blog...Tuesdays with Morrie navaache pustak wach.
Solid lihile ahe
Ek Number....
Kay re kay zale tula 1 dum mage pan solid and ya veli pan december madhe yeshil tevha check karun gheu ;)
Onkar
kishore khup bhari lihilays...sanyasache mahatva bhari lihilay.
कधीही कोठेही कसेही काहीही लिहीतोस तू.
2008 james dharala ani 4 warsha waja kele tar ajoba 1932 madhe janmala ale. Galli cricker, moped ani ashya baryach goshti pachalya nahi. But creativity chhan ahe..
आपण लेख वाचलात हे पाहून आनंद झाला. पब्लिश करण्याच्या गडबडीत मी बऱ्याचदा हा विचारच करत नाही. आता करावा लागेल. खरं तर कोणी हे लेख वाचेल असं वाटलंच नव्हतं [:D]
khup sunder lekhanshaili aahe....
harshada.
apratim !!!
टिप्पणी पोस्ट करा