आपण या Blog वर स्वत:च्या जबाबदारीवर येत आहात. नावाप्रमाणे या वर कोठेही काहीही कसेही कितीही अशा प्रकारचे लेख असायची शक्यता आहे.
हे लेख वाचून आपल्याला मानसिक धक्का वगरे बसल्यास लेखक जबाबदार नाही. लेखकाने लिहिलेल्या लेखांशी स्वत: लेखकही सहमत असेलच असे नाही. (जसे इंजिनियरिंग चा पेपर आपण जोरात लिहितो, आणि आपल्यालच माहीत नसतं आपण काय लिहिलंय, पण मार्क बरोबर मिळतात [अर्थातच ४०])
लेखकाचा पहिलीपासूनच शुद्धलेखनाशी ३६ चा आकडा आहे. म्हणून तसल्या फाजील अपेक्षा ठेवू नयेत.
आपल्याला माझे लेख कोठे वापरायचे असतील (अर्थातच तुमची मती फिरली असेल तर) तर कृपया डायरेक्ट ढापू नयेत. मला कळवा ना, आपण व्यवहाराचं ठरवू काय ते!
आणि हो, हे वाचून आपण जर ओळखलंत की लेखक पुणेकर आहे, तर काही कौतुक नाही. हे कोणीही ओळखेल.
Friday, April 6, 2007
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


5 टिप्पणी(ण्या):
aaishappath ultimate
kishor zakkas
EK no ahe heee...bhaari
Are tu lekhak ka hot nahis?
lay-bhaari aahe..
-MS
टिप्पणी पोस्ट करा