Saturday, April 21, 2007

टेस्टीमोनियल्स ची कथा!

या साइट वर प्रत्येक तरूण register झाला आहे. या साइटचे कोट्यावधी यूजर्स आहेत. इकडे सर्व प्रकारचे (हो सर्व प्रकारचे) लोक आढळतात. तुम्ही ओळखलंच असेल मी Orkut बद्दल बोलतोय!


तर या साइट वर टेस्टीमोनियल्स नावाचा एक प्रकार (फिचर) अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल (नशिबवान असाल तर मैत्रिणींबद्दल) चांगल्या गोष्टी लिहायच्या. आता टेस्टीमोनियल म्हणजे स्तुती करणं आलं. मग त्यातुन घडणाऱ्या गमती जमतीही आल्या. मला काही टीका करायची नाही आहे कोणावर. पण मी ऑर्कूट वर वेळ फुकट घालवला नाही आहे तर Research केला आहे हे सांगायचं आहे.


मला ही साइट जॉईन करण्यामागचे अनेक फायदे माहिती आहेत. त्यातलाच एक म्हणजे नकारात्मक दृष्टीकोनाचा नाश! नाही खरं सांगतोय मी. पहा ना जरा आजुबाजूला. प्रत्येक प्रोफाइल मधे तुम्हाला एक तरी टेस्टीमोनियल दिसेल. आता तुमच्या सगळ्याच फ्रेंड्स बद्दल तुमचं मत चांगलं असणं शक्यच नाही (सामान्य माणसांबद्दल चाललय बरं). पण थांबा. त्यांच्या प्रोफाइल मधे जरा डोकावून पहा. काय? दिसतंय का एखादं टेस्टीमोनियल? कसं अगदी पाकात बुडवून चरित्र लिहीलेलं असेल त्या व्यक्तिचं. सांगायचा मुद्दा असा की जगात सगळेच चांगले लोक आहेत. Be positive, think positive. हे आहे आर्ट ऑफ लिविंग.


एक क्लास आहे अशा लोकांचा की जे एखदयाने आपल्याला टेस्टीमोनियल लिहावं म्हणून त्याला टेस्टीमोनिअल लिहितात. हे शक्य आहे का सांगा मला. अपेक्षाभंग नाही होणार तर काय होणार अशा लोकांचा. इथेच थांबत नाही हे सगळं, एक मित्र मला म्हणाला "माझ्यासाठी तू टेस्टीमोनियल लिहि ना". एक जण ओळखीतला आहे, तो तर म्हणाला "मला टेस्टीमोनियल लिहायला आवडतं". वा रे वा. काय छंद आहे! आणि त्याने अक्षरश: चाळीस एक टेस्टीमोनिअल लिहिली असतील. लिहि लेका लिहि. मनसोक्त लिही.



सचित्र टेस्टीमोनियल आपण बघितलीच असतील. त्या टेक्स्ट बॉक्स मधे पण काय एक एक कला सादर करतात लोक.फार लिहायची गरज नाही याबाबत. A picture is worth a thousand words.












आणखी एक मजेशीर प्रकार पहा, धन्य झालो!






आणखी एक क्लास म्हणजे, नावाचे फूल फॉर्म करून लिहिणे. (कंपल्सरी जुळवतात हो लोक, काय करावं आता). नावाचा फूल फॉर्म नही जमला, तर ए टू झेड कशासाठी आहे?





बरेच दावे पण केले जातात
उदा.
१ Words are not enough
२. ऑल राऊंडर
३. क्यूट! (प्रत्यक्षात, कोणालाही भीतीच वाटावी अशी पर्सनॅलिटी असते)


आणी हो, जे लोक टेस्टीमोनिअल लिहीण्याला आपला छंद मानतात, ते कॉपी पेस्ट तंत्राचा वापर करतात. उदा. एक्स ने ए बी सी डी या मित्रांन्ना टेस्टीमोनिअल लिहीलं असेल, तर त्याचा बारकाइने ’अभ्यास’ करा. कॉपी पेस्ट तंत्राचा वापर तुम्हाला नक्की दिसेल. Creativity संपली असावी बहुदा.


खरंच Creativity संपली असेल का हो? छे, अजून विविध क्लास असतीलच की. जरा तुम्हीपण द्रुष्टीक्षेप टाका. आणि कॉमेंट करा.

4 टिप्पणी(ण्या):

sanket म्हणाले...

marathit na lihalyabaddal kshamaswa


tuza research kharokharach khup changla ani faydyacha ahe pan are positive attitude vagaire thik ahe pan layki nasatana harabharyachya zadavar chdhvu naye

Pankaj म्हणाले...

zakas blog

Pankaj म्हणाले...

keep writing...

Nachiket म्हणाले...

Kahi lok one line testimonial lihitat [:D]